नाशिक मधील फिरण्याची ठिकाणे Nashik Madhil Firnyache Thikaane

नाशिक Nashik

nashik madhil firnyache thikaane


नाशिक जिल्हा हा महाराष्ट्राच्या उत्तर- पश्चिम भागामधे स्थित आहे समुद्र सपाटी पासून सुमरे ५६५ किमी उंचीवर स्थित आहे. ह्या जिल्ह्यला महान पौराणिक पर्श्वभूमि आहे भगवान राम आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे वस्तव्यास होते त्याशिवाय अगस्त्य ऋषि देखिल तपस्ये दरम्यान नाशिक येथे राहिले आहे.  महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखाली  जाणारी गोदावरी नदिचा उगम नशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे

त्र्यंबकेश्वर हे शिव मंदिर त्र्यंबक  या गावात स्थित आहे ते १२ ज्योतिर्लिगापैकी एक आहे त्र्यंबकेश्वर येथे हिंदू वंशावलीची  नोंदणी केली जाते नशिकला अनेक  प्रसिद्ध व्यक्ति मिळाल्याचे सौभाग्य लाभले आहे ,वि.वा.शिरवाडकर, अनंत कान्हेरे, दादा साहेब पोतनीस, सावरकर, बाबुभाई राठी लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रात नाशिकचा ३ रा क्रमांक लागतो

नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे  ६१,०९,५२२  इतकी आहे सुमारे १५,५४२ चौ.किमी.इतके क्षेत्रफळ आहे उत्तरेला धुळे जिल्हा पूर्वेस जळगाव,  नैऋत्येस ठाणे, दक्षिण-पूर्व  औरंगाबाद जिल्हा. नाशिक  येथे फिरण्या साठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत तर चला बघूया आपण  नाशिक मध्ये काय काय आहे


नाशिक मधील फिरण्याची ठिकाणे Nashik madhil firnyache thikaan


१) अंजनेरी Anjaneri

Anjaneri hills during monsoon


नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे। अंजनेरी गावत गेल्यावर पायरीने गडावर येते पवन पुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर माता  अंजनि यांच्या पोटी झाला आहे म्हणून या किल्याला अंजनेरी हे नाव देण्यात आले आहे डोंगरावरच हनुमान लहानाचे मोठे झाले आहेत असे म्हटले जाते येथे १०८ जैन लेण्या आहेत.अंजनेरी डोंगरावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे त्यांच्या अभ्यासात स्पष्ट झाले. सिरोपेजिया अंजनेरिका’ ही दुर्मीळ वनस्पती  जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही ती अंजनेरी डोंगरावर आहे। येथे कीटकभक्षी वनस्पतीही आहेत.तर जरूर या ठिकाणाला भेट दया


२) नाणे संग्रहालय Coin Museum

coin museum nashik


नाशिक पासुन सुमारे २० किमी अंतरावर नाशिक- त्रंबकेश्वर रोड वर नाणे संग्रहालय आहे। या संग्रहालयात

 भारतातील नाणे व नोटांचा इतिहास आहे। आशिया खंडातील हे एकमेव नाणे  संग्रहालय आहे


३) गारगोटी  खनिज संग्रहालय Gargoti Mineral Museum

gargoti mineral museum


माळेगावच्या औद्योगिक वसाहतीत श्री. के. सी. पांडे यांनी दोन काटी रुपये खर्च करून आशिया खंडातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे गारगोटी संग्रहालय उभारले आहे। गारगोटयांचा विविध आकारातील, रंगातील संग्रह थक्क करणारा आहे सोने, हिरा, झिओराईट, कॉव्हानाईट असे अनेक प्रकारच्या नैसर्गिक गारगोटया आपल्याला पहायला मिळतात. मुख्य म्हणजे आगाऊ सुचना दिल्यास हे प्रदर्शन प्रेक्षकांकरिता २४ तास खुले असते


४) पांडवलेणी आणि दादा साहेब फाळके संग्रहालय PandavLeni & Dada Saheb Falke Smarak

हे ठिकाण नाशिक- मुंबई महामार्ग क्रमांक ३ वर आहे बौद्ध विहारात  बुध्दाची भव्य मूर्ती  स्थित आहे व  बुध्दाच्या जन्मापासुन ते मृत्यूपर्यंतची माहिती लिखित स्वरूपात आहे


५) पहिने धबधबा Pahine Waterfall

pahine waterfall


हे ठिकाण नाशिक पासुन ३० किमी आणि त्रंबकेश्वर पासुन १० किमी अंतरावर आहे। पहिने धबधबा हा सिनेमेट्रोग्राफि साठी प्रसिद्ध आहे येथिल निसर्गरम्य वातावरण तुम्हाला भारावून सोडेल अजुबजुने डोंगर आहेत आणि त्यात वहणारा तो धबधबा हे निसर्ग सौंदर्य बाघण्या लायक आहे  येथिल मटन भकारी प्रसिद्ध आहे


६) काळाराम मंदिर Kalaram Mandir

kalaram mandir


 सरदार रंगराव गोऱ्हेकर यांनी सन १७८२  साली जुन्या लाकडी मंदिराच्या जागी बांधले आहे। प्रभु राम आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी वास्तव्यास होते त्या जागी हे मंदिर आहे


७)  पंचवटी Panchvati

नाशिक शहरात पंचवटी हा परिसर गोदावरी नदीच्या तिरावर आहे। काळाराम मंदिराजवळ 

वटवृक्षांचा समुह आहे, हा समुह पाच वटवृक्षांपासुन तयार  झाला रहने असल्यामुळे यास पंचवटी असे म्हटले जाते येथे भगवान राम आपल्या वनवास दरम्यान या परिसरात वस्तव्यास होते त्यामुळे  हे धार्मिक स्थळ मानले जाते



८)  रामकुंड Ramkund

 हे ठिकाण गोदावरी नदी तिरावर आहे येथे दर १२ वर्षाने कुंभमेळा भरतो


९)  सोमेश्वर मंदिर Someshwar Mandir

 हे मंदीर नाशिक मध्यवर्ती बस स्थानकापासुन 8 कि.मी अंतरावर गंगापुर रस्त्यावर आहे। गोदावरी तीरी असलेल्या हया मंदिरात भगवान शिव व हुनुमानाची मुर्ती असुन परिसर वृक्षवेलींनी वेढलेला आहे। दर्शनांनतर नदीत बोटिंग व पोहण्याचा आनंद घेता येतो


१०) सप्तशृंगी गड Saptshrungi Gad



श्री सप्तशृंगी गड  नाशिक पासुन ६० किमी अंतरावर कळवण तालुक्यात  स्थित आहे देवीचे मंदिर सात शिखराने वेढलेले असून  समुद्र सपाटी पासुन ४६५९  फुट उंचीवर आहे


११) सिता गुफा Sita Gufa



 जेव्हा लक्ष्मण ने सुपर्णका चे नाक कापले होते तेव्हा  १००००  राक्षस भगवान राम आणि लक्ष्मण सोबत लढायला आले, तेव्हा पंचवटी हे एक घनदाट जंगल होते।  तेव्हा भगवान राम, लक्ष्मण आणि सीता  यांनी लपण्यासाठी गुफ़ा तयार केली  आज ती सीता गुफा म्हणून ओळखली जाते इथूनच रावण ने सीते चे अपहरण केले होते। गूफे की उंची सुमरे २.५- ३ फुट आहे. तुम्ही जस जसे   आत  जाल ती कमी कमी होत जाते त्यामुळे ज्याना श्वसणाचे आजार असल्यास त्यांनी गूफेत जाने टाळावे


१२) मांगीतुंगी मंदिर Maangitungi Mandir



हे नाशिक शहरा पासुन १२५ किमी अंतरावर सटाणा येथे स्थित आहे। मांगी तुंगीच्या पायथ्याशी ‘’भिलवाडी’’ हे गांव आहे येथे साधना केल्याणे मोक्ष प्राप्ती मिळते असे मानले जाते

१३)  त्र्यंबकेश्वर Trayambkeshwar



महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखाली  जाणारी गोदावरी नदिचा उगम नशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे त्र्यंबकेश्वर हे शिव मंदिर 'त्र्यंबक' या गावात स्थित आहे । ते १२ ज्योतिर्लिगापैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर येथे हिंदू वंशवलीची  नोंदणी केली जाते. येथे दर १२ वर्षाने कुंभमेळा भरतो




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपल्या नावासाठी गूगल शोध निकालांमध्ये कसे दिसावे व गूगल पीपल कार्ड (Google People Card) कसे जोडावे?